30
Jun
10 Tips To Whatsapp Users
10 Tips To Whatsapp Users
वॉट्सअॅप युजर, तुमच्या माहिती करीता.
- कोणताही टेक्स्ट/ मेसेज इतरांना फॉरवर्ड केल्यामुळे वॉट्सअॅप कंपनी तुम्हाला किंवा कोणत्याही गरजवंताला कसलीहि मदत करीत नाहि. त्यामुळे तुम्ही अमुक मेसेज एवढ्या जणाना पाठवा म्हणजे कंपनीकडुन त्या कुटंबास मदत होईल असे आलेले मेसेज पुर्णपणे खोडसाळ असतात.
- काहि समाजकंटक सुड उगवण्याच्या इराद्द्याने तरुण मुली, स्त्री, लहाण मुलांचा चा फोटो टाकुन खोडसाळ मेसेज तयार करतात. ज्या मेसेज मध्ये कोणताही संपर्क पत्ता अगर संपर्क क्रमांक दिलेला नसतो. तसे मेसेज कधीहि फॉरवर्ड करु नका. अन्यथा सायबर क्राईम अंतर्गत तुमच्या वर गुन्हा दाखल होऊ शकतो.
- एखादी व्यक्ती हरवली असेल सोबत संपर्क क्रमांक असणारा मेसेज आला आणि खरच तुम्हाला त्याला मदत करायची असेल तर त्या संपर्क क्रमांकावर प्रथम फोन करा आणि हकिगत खरी कि खोटी आहे हे जाणुनच मगच मेसेज पुढे फॉरवर्ड करा.
- अॅक्सिडेंट मध्ये लहाण मुले सापडली असा फोटोसहित मेसेज पाठविला जातो. असे मेसेज ब-याच वर्षा पुर्वीचे किंवा महिण्या पुर्वीचे असतात. भावनिक होऊन आपण ते फॉरवर्ड करतो. जेव्हा खरी हकिगत कळते तेव्हा आपण खजिल होवुन स्वत: च्या कृत्याची आपणांस लाज वाटते.
- “ईसीस किंवा दहशत वादी संघटनेने बनविलेल्या गृपचे आपणास आमंत्रण येईल. आपण ते स्विकारु नका कारण एकदा त्या ग्रूपवर अॅड झालात कि बाहेर पडता येत नाहि. हा मेसेज फॉरवर्ड करा. “असे मेसेज तुम्ही भावनेच्या आहारी जावुन पुढे पाठविता. खरे पहाता वॉट्सअॅप कंपनीचे अशा संघटनांच्या कार्यवाही वर लक्ष असते. वॉट्सअॅप ची पॉलीसी बदलण्याचा(जसा एकदा त्या ग्रूपवर अॅड झालात कि बाहेर पडता येत नाहि) अधिकार कोणत्याहि युजर ला नाही.
- ग्रुपवर एखादा मेसेज फॉरवर्ड करावयाचा झाल्यास त्या ग्रुपचा उद्देश लक्षात घ्या. असंबधीत पोस्ट (गुड मॉर्निंग,गुड नाईट सारखे) करुन इतर सभासदांचे (वेळ व पैसा)नुकसान करु नका.
- एखादा ग्रुप बनविल्यास त्या ग्रुपमध्ये कुणा युजरला अॅड करायाचे असल्यास त्या युजरला इनव्हिटेशन पाठवा. म्हणजे त्याच्या इच्छेनुसार तो त्या गृपचा सभासद बनतो. जबरदस्ती ने सभासद बनवु नका. ग्रुप बनविल्यानंतर न चुकता डिस्क्रिप्शन लिहा म्हणजे आपल्या गृपचा उद्देश व नियम सभासदांना समजतात.
- मानहानिकारक, जातीयवादि, धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह मेसेज ग्रुपवर पाठऊ नका. आपणावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
- समाज कंटकांनी काहि व्हिडीओ एडीट करुन व्हायरल केले आहेत, सुरुवातीला उपयोगी माहिती दाखवुन अचानक पॉर्न व्हिडीओ सुरु होतो. त्यामुळे एखादा व्हिडीओ संपुर्ण बघुन झाल्यानंतरच फॉरवर्ड करा. अन्यथा आपणावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
- वॉट्सअॅप चा अति वापर आपल्या प्रकृती वर परीणाम करतो. डोळे, मान आणि पाठीचाकण्या संबधीत आजार उद्भवतात. त्यामुळे मोबईल चा वापर मर्यादीत ठेवा.
Category: Blog