Email Marketing कसे करावे ?
Email Marketing
काहि डिजीटल मार्केटिंग मध्ये पारंगत असलेल्या लोकांचे असे म्हणणे आहे कि इमेल मार्केटींग हे आता तितकेसे effective राहिलेले नाहि, आता ते outdated देखिल झालेले आहे. परंतु माझे म्हणणे असे आहे कि इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहोचुन, scheduled emails च्या मदतीने ग्राहकांना nourish करत, उत्पादनाची विक्रि करता येते. हे माध्यम योग्य रितीने वापरल्यास प्रभावी ठरते.
पुर्वी बल्क email चे माध्यम निवडले जायचे. इमेल आयडी चा डेटाबेस संकलित केला जायचा किंवा काहि खाजगी कंपनी कडुन विकत घेतला जायचा. Mailchimp, Aweber, Drip, Getresponse सारख्या टुल्स चा वापर करुन वारंवार इमेल चा भडीमार केला जायचा. काही वेळा या प्रक्रियेला स्पॅमिंग म्हणुन बेकायदेशीर ठरविले जायचे. अजुनही काही मार्केटर्स या पद्ध्तीने Email Marketing करतात.
कालांतराने या पद्धतीत बदल झाला. वेबसाईट मधील opt-in form च्या माध्यमाने केवळ ईच्छुक ग्राहकांचे नाव व इमेल आयडी मिळवीला जातो. ठराविक कालावधीच्या अंतराने ग्राहकांना ज्ञान देणारे इमेल्स पाठविले जातात. ग्राहकांना प्रशिक्षित केले जाते. त्यानंतर उत्पादनाचे महत्व सांगणारे मेल्स पाठविले जातात. ग्राहक समाधानी झाल्यावर अखेरीस आर्थिक व्यवहार पुर्ण केला जातो. याठिकाणी ग्राहकाच्या परवानगीने इमेल्स चे आदान प्रदान होते याचा अर्थ हि प्रक्रिया स्पॅमिंग मध्ये मोडत नाहि.
Email Marketing साठी वापरण्यात येणारे टुल्स
Email Marketing साठी काही टुल्स विना मोबदला वापरता येतात तर काही टुल्स विकत घेतले जातात. त्यापैकीmailchimp हे टुल पहिल्या १०, ००० ते १५००० इमेल्स साठी फ्री आहे. त्यांनतर आपणास पैसे मोजावे लागतात. या टुल्स चा वापर करुन email list, auto responder, email scheduling करता येते तसेच email reports तपासता येतात.
Email Marketing करीता १० Tips
- Email Marketing साठी permission based इमेल लिस्ट वापरा.
- तुम्ही टाईप केलेल्या Email Text मध्ये वेबसाईट वर ट्राफिक आणणा-या २-३ लिंक्स असाव्यात
- इमेल चा Subject आकर्षक व शॉर्ट असावा
- योग्य ठिकाणी इमेज चा वापरा करावा
- तुमच्या इमेलमधील माहिती 80% ज्ञान देणारी तर २० % तुमचे उत्पादन प्रमोट करणारी असावी
- दररोज पुन्हा पुन्हा तेच मेल पाठवीण्यापेक्षा ठराविक वेळेनंतर नविन माहिती संगणारे मेल्स पाठवावे
- Newsletter किंवा RSS फीड चा वापर करावा
- योग्य वेळी इमेल्स पाठवा. साधारणपणे ऑफिस टाईम टाळा.
- इमेल मोबाईलवर व्यवस्थित दिसेल या विचाराने मेल मधील माहिती लिहा
- सोशल मिडीया प्रोफाईल ची लिंक इमेल मध्ये द्या