SEO Information in Marathi
SEO म्हणजे काय?
या ठिकाणी आपण SEO म्हणजे काय आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ज्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल जसे की; हॉटेल, रिसॉर्ट, शाळा, महाविद्यालय, सरकारी योजनांबाबत माहिती इ. तर आपण लगेचच गुगल किंवा इतर सर्च इंजिन वर सर्च करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो. येथे सर्च केल्यावर आपल्याला विविध रिजल्ट मिळतात, परंतु आपण कधी विचार केला आहे का की हे रिझल्ट कसे व का आले असतील?
याचे मुख्य कारण म्हणजे SEO आहे. चला तर मग SEO म्हणजे काय? हे आपण जाणून घेऊया.
त्याचप्रमाणे स्वतःचा बिझनेस सुरू करून Domain Hosting तसेच वेबसाईट इ. सर्व विकत घेऊन देखील आपली वेबसाईट सर्च इंजिन मध्ये रँक होतच नाही, जेव्हा त्या मागची बाजू समजून घेतली त्यावेळी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणून एक घटक आहे जो वेबसाईट साठी महत्त्वाची आहे, हि गोष्ट समजली. तुमचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी थोडासा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली वेबसाईट रँक होण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चला तर मग डिटेल मध्ये बघूया आणि आपला बिजनेस ग्रो करुया.
SEO म्हणजे विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरून आपल्या वेबसाईटला सर्च इंजिन मध्ये रँक करण्याची प्रक्रिया होय. आपला SEO चांगल्या प्रकारे केला असेल तर मोठ्या प्रमाणात आपली वेबसाईट up दिसू शकते आणि आपण ऑरगॅनिक पद्धतीने ग्राहक मिळवु शकतो.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन यामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत हे खालील प्रमाणे स्पष्ट होतील :
On page SEO: म्हणजे ऑन साईट ऑप्टिमायझेशन होय. आपली वेबसाईट किंवा त्यातील पेजेसची रँकिंग मिळवण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज, ऑफर्स, माहिती प्रदर्शित केल्या जातात त्याला On page SEO म्हणून ओळखले जाते. पुढील प्रमाणे ऑनलाईन चे महत्वाचे घटक आहेत.
टायटल टॅग – शीर्षक टॅग :
शीर्षक टॅग आकर्षित असावे आणि शीर्षक टॅग मध्ये आपल्या व्यवसायाबद्दल मुख्य की वर्ड चा वापर असावा. जेणेकरून वाचक आकर्षित होतील. यामुळे आपला सी टी आर देखील वाढतो. समोरचा व्यक्ती काय सर्च करेल या अंदाजाने शीर्षक टॅग असावा.
मेटा वर्णन – मेटा डिस्क्रिप्शन :
मेटा डिस्क्रिप्शन हे साधे व सोप्या शब्दांमध्ये असायला हवे, जेणेकरून वाचकांना वाचल्यानंतर आपल्या लेखांमध्ये काय लिहिले आहे याची कल्पना आली पाहिजे आणि वाचक आपल्या वेबसाईट मध्ये किंवा पेज मध्ये काय माहिती दिली असेल ते वाचण्यासाठी उत्सुक झाला पाहिजे. मेटा डीस्क्रीप्शन मध्ये योग्य लॉंन्ग टेल की वर्ड चा वापर करावा. हे मेटा डिस्क्रिप्शन 150 कॅरेक्टर पर्यंत असावे लागते. वाचकांना ते स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे.
यु आर एल ऑप्टिमायझेशन :
यु आर एल ला परमा लिंक सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट किंवा पेज पब्लिश करता त्यावेळी युआरएल हा SEO चा महत्वाचा ऑन साईड फॅक्टर आहे. आपल्या पेजच्या किंवा पोस्टचा युआरएल बनवताना आपल्या पोस्टचा मेन विषय काय आहे हे युआरएल म्हणजेच वेब पत्ता यामध्ये देणे आवश्यक आहे. यु आर एल हा जास्त लांब लचक नसावा.
हेडिंग टॅग :
हेडिंग टॅग म्हणजे H1 होय. आपल्या लेखांमध्ये किंवा आपल्या वेबसाईट मध्ये जे काही महत्त्वाचे किंवा मुख्य असेल त्याला हेडिंग टॅग दिला जातो यामध्ये मुख्य keyword चा वापर करावा. हेडलाईन नंतर जे tags असतात त्यांना sub heading असे म्हटले जाते. जसे की H2, H3, H4.
तसेच आपण हेडिंग मध्ये H1 पासून H6 पर्यंत हेडिंग चा वापर करू शकतो. हेडिंग टॅग आपल्या वेबसाईटच्या रँकिंगसाठी खूप महत्त्वाचा घटक मानला जातो.
प्रतिमा ऑप्टिमायझेशन – इमेज ऑप्टिमायझेशन :
वेबसाईट किंवा वेब पेजेसला आकर्षित बनविण्यासाठी काही आकर्षक इमेजेस वापरणे गरजेचे असते. आपल्या वेबसाईट मध्ये फक्त माहिती असून चालत नाही तर इमेजेस ग्राहकांना आकर्षित करतात, तसेच वाचक अधिक वेळ देऊन आपली वेबसाईट पाहण्यासाठी इच्छुक होतो वेबसाईटवर अपलोड केलेल्या इमेजेस मध्ये देखील कीवर्ड चा वापर करणे आवश्यक आहे.
अंतर्गत दुवा – इंटरनल लिंक :
इंटरनल लिंक एका वेबसाईटवरील विविध अंतर्गत पेजेस वर जाण्यासाठी लिंक वापरली जाते. आपल्या वेबसाईटवर इंटरनल लिंकिंग करणे महत्त्वाचे असते कारण यामुळे आपल्या वेबसाईटच्या pages, posts ची रँकिंग वाढण्यासाठी मदत होते आपण आपले महत्त्वाचे संबंधित पेजेस इंटरनल लिंकिंग मुळे एकमेकांशी जोडू शकतो, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सहजरीत्या एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाता येते.
बाह्य दुवा – एक्स्टर्णल लिंक :
एक्स्टर्नल लिंक म्हणजे आपल्या वेबसाईट वरून एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवर आपल्या पेजच्या संबंधित जर महत्वाची माहिती असेल तर या ठिकाणी एक्स्टर्णल लिंक वापर केला जातो. एक्स्टर्नल लिंक मध्ये एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाण्यासाठी वापरले.
नवीन सामग्री चा वापर युनिक कंटेंट :
आपल्या वेबसाईट मध्ये माहिती लिहिण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे युनिक कंटेंट होय. आपल्या वेबसाईट मध्ये कंटेंट समजायला सोपा जावा तो किचकट असू नये परंतु त्याचप्रमाणे तो इतर वेबसाईटवरून कॉपी केलेला असू नये. जेवढा तो नवीन असेल तेवढा जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. कंटेंट हा अतिशय मोठा किंवा अतिशय लहानही असूनही नाही नये.
ऑफ पेज SEO म्हणजे काय ? :
ऑफ पेज SEOम्हणजे आपल्या वेबसाईट, पेजेस, ब्लॉग किंवा पोस्ट यांचे प्रमोशन करणे होय. जसे की लोकप्रिय वेबसाईट किंवा वेब पेज ब्लॉग इ. ठिकाणी जाऊन आपल्या वेबसाईटची लिंक समाविष्ट करणे यालाच ऑफ पेज ऑप्टिमायझेशन असे म्हणतात. सर्च इंजिन वर काही परिणाम सर्च केले असता आपल्याला काही रिझल्ट दिसतात या रिझल्ट मध्ये आपली वेबसाईट रँकिंग मध्ये येण्यासाठी ज्या काही बाहेरील प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियेला ऑफ पेज SEO असे म्हणतात. ऑफ पेज SEO रिझल्ट मध्ये वेबसाईटची गुणवत्ता समाज सुधारण्यास मदत करते. त्याचप्रमाणे रहदारी वाढविते. ऑफ पेज SEO मध्ये दुसऱ्या वेबसाईटवर आपल्या वेबसाईटची लिंक दिली जाते ज्यामध्ये दोन प्रकारचे बँक लिंक असतात डू फॉलो बॅक लिंक, नो फॉलो बॅक लिंक.
बॅक लिंक :
बॅक लिंकमहत्वाचा भाग आहे, ज्यामुळे आपली वेबसाईट गुगलमध्ये स्ट्रॉंग बनते व त्यामुळे वेबसाईटची ऑथॉरिटी मारायला मदत होते. आपली वेबसाईटवर सुरक्षित राहते.
लिंक बिल्डिंग :
लिंक बिल्डिंगमध्ये आपल्या वेबसाईट साठी बाह्य वेबसाईटवर लिंक तयार केले जातात. हे करणे महत्त्वाचे असते कारण त्या लिंकच्या सहाय्याने आपल्या वेबसाईटवर रहदारी वाढते व आपल्या वेबसाईटची सुरक्षितता तयार होते म्हणून हाय क्वालिटी लिंक योग्य प्रकारे घ्यायला हवे त्यामुळे आपल्या वेबसाईटची पेज श्रेणी अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्यास मदत होते.
सोशल नेटवर्किंग साईट्स, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, गेस्ट पोस्टिंग, आन्सर क्वेश्चन, गुगल फॉर्म, पीडीएफ, व्हिडिओ मार्केटिंग, फोटो शेअरिंग, आर्टिकल सबमिशन, कॉमेंट्स…
सोशल मीडिया मार्केटिंग :
सोशल मीडिया मार्केटिंग हा off page SEO चा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आपल्या वेबसाईट ची माहिती प्रसारित करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग चा वापर केला जातो. त्यामध्ये आपली वेबसाईट जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब, ट्विटर, LinkedIn इ. वर विविध प्रकारच्या कंटेंट व माहिती पोस्ट, शेअर, प्रोमोशन करणे इ. प्रकारे सोशल मीडियावरून ग्राहकांना आकर्षित केले जाते.
टेक्निकल SEO म्हणजे काय?
टेक्निकल SEO हा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा फार महत्त्वाचा घटक आहे. टेक्निकल SEO म्हणजे आपल्या वेबसाईटचा युजर एक्सपिरीयन्स असतो आणि त्यामध्ये त्याच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईट अधिक चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज करू शकतो. यामध्ये कोडींग Site मॅप, रोबोट.txt, साईट आर्किटेक्चर, इंडेक्सिंग, कॉलिंग या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या सर्वांचे चांगल्या प्रकारे ऑप्टिमायझेशन करणे यालाच टेकनिकल एसयू असे म्हणतात. यामुळे वेबसाईटचा स्पीड, वेबसाईट मोबाईल फ्रेंडलीनेस, यु आर एल स्ट्रक्चर, रोबोट.txt, साईट मॅप SSL सर्टिफिकेट इ. समावेश होतो.
FAQ:
आपल्या वेबसाईट मध्ये एफ ए क्यू हा एक महत्त्वाचा घटक आहे वेबसाईट मध्ये FAQ ऍड करून आपल्या वेबसाईट बद्दल जास्तीत जास्त माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविता येते.
.