
Social Media Literacy | Check Text/Post Before Forwarding | सोशल मिडीया साक्षरता
सोशल मिडीया वर आलेल्या वास्तविक बातम्या आणि बनावट बातम्या कशा ओळखाव्यात हि प्रक्रिया जाणून घेणे हा सोशल मिडीया साक्षरतेचा एक भाग आहे. चला तर आजपासुन सोशल मिडीया साक्षर होऊया. सोशल मिडिया वर आलेली बातमी खरी आहे कि खोटी हे जाणून घेण्यासाठी पुढील ३ प्रश्न स्वत: ला च विचारा आणि मगच ठरवा ती पोस्ट पुढे पाठवायची की नाही.
स्वतःला विचारायचे ३ प्रश्न
१. बातमीचा स्त्रोत काय आहे ?
एखादी बातमी बनावट आहे का? हे शोधण्याकरीता पहिल्या प्रश्नाचे उत्तर तपासा : हे तपासण्या करीता खालील काही मुद्दे लक्षात घ्या
– आलेली पोस्ट किंवा बातमी ही एखाद्या पत्रकारा कडून किंवा त्या बातमी/ पोस्ट शी संबंधीत व्यक्तीकडुन किंवा संस्थे कडून आली असेल तर ती बातमी खरी असेल.
– जर ती बातमी एखाद्या वेबसाईट वरून किंवा वेबसाईट च्या संदर्भा सहीत(लिंक सहीत) आली असेल तर पडताळून पहा ती वेबसाईट प्रख्यात न्यूज़ पेपर किंवा न्युज एजंसी ची आहे का? किंवा संबंधीत संस्थे ची आहे का ?
– जर बातमी प्रशासन संदर्भात असेल तर त्या वेबसाईट च्या नावा अखेरीस .gov,.gov.in, .edu, .org या अक्षरांचा समुह आहे का ? हे पहा.
– जर वेबसाईट योग्य(genuine) असेल तरीही मेसेज सोबत आलेली लिंक उघडल्यानंतर संपुर्ण बातमी दिसते का ? हे तपासा. या ऐवजी जर “404 page not found” असा मेसेज दिसत असेल तर ती बातमी खोटी असु शकते.
– इतर सोशल मिडीया(facebook, instagram) वरिल पेज, टाईम लाईन मध्ये आलेले पोस्ट हे खरे नसतात. ते तपासल्या शिवाय पुढे पाठवू नक.
२. बातमी चा विषय काय आहे ?
– काही वेळा आपल्या सदसद् विवेकबुद्धी ने एखादा मेसेज/बातमी वाचल्या नंतर ती खरी कि खोटी हे लगेच समजते. जेव्हा एखादी बातमी/पोस्ट सांशक वाटत असेल तेव्हा ती पुढे पाठवू नका.
-इतर ग्रुप वर हिच बातमी कोणी पाठविली आहे का व पाठविणारी व्यक्ती अभ्यासू किंवा प्रश्न क्र. १ च्या उत्तरापैकी आहे का ते तपासा.
-ती बातमी पुढे पाठविण्यापुर्वी त्या बातमी चा समाजावर होणारा परीणाम काय असेल याचा विचार करा.
– धार्मिक तेढ किंवा जातिय वाद निर्माण करणारा मेसेज तसेच एखाद्या व्यक्त्तिची मानहानी होईल असा मेसेज तयार करु नये व पुढेही पाठवू नये. तो आय टी अॅाक्ट नुसार गुन्हा होतो.
– भावनीक व सहानूभुती निर्माण करणारे मेसेज(मुल हरविले/सापडले आहे, अपघात झालेला आहे, आर्थिक मदत हवी आहे) सोबत जर संपर्क क्रमांक नसेल तर तो मेसेज कधीच पुढे पाठवू नका. ते खोटे असतात.
– एखादी बातमी जुनी असु शकते त्या बातमी ला गूगल वर शोधा आणि कोणत्या तारीखला प्रख्यात न्यूज़ पेपर किंवा न्युज एजंसी च्या वेबसाईटवर प्रसारित केली आहे हे हेड लाईन च्या खाली दिलेली तारिख बघून तपासा.
– आलेली बातमी हे एखाद्याने दिलेले मत आहे कि वास्तवता आहे तपासा
– काही वेबसाईट वर पंतप्रधान/ मुख्यमंत्री योजना मिळविण्यासाठी ऑन माहीती घेणारे फॉर्म उपलब्ध असतात. त्या प्रशासकीय वेबसाईट नसून माहिती गोळा करणा-या मार्केटिंग एजंसी असतात. वेबसाईट च्या नावा अखेरीस .gov,.gov.in, .edu, .org या अक्षरांचा वापर नसेल तर त्या वेबसाईट फसव्या असतात.
३. फेक मेसेज पाठविला तर काय कारवाई होवू शकते?
– एखाद्या व्यक्तीची मानहानी करणारा, धार्मिक तेढ किंवा जातीयवाद निर्माण करणारा मेसेज तयार करणे किंवा पुढे पाठविणे हे IT Act Section 66A व IPC 499 नुसार गुन्हा म्हणुन नोंद हो ऊ शकते. ज्या मध्ये शिक्षा म्हणुन द्रव्य दंड किंवा जेल किंवा दोन्ही होऊ शकतात. एखाद्या ने मांडलेल्या मानहानी करना-याला मताला like, thumb करुन मत प्रदर्षित करणे किंवा दुजोरा देणे हा देखील तेवढ्याच गाम्भिर्याचा गुन्हा होतो.
म्हणुन सोशल मिडिया वापरताना सावधानता फार महत्त्वाची असते. “मला हा कायदा माहीत नव्हता नाहितर मी अशी चुक केलीच नसती “ असे न्यायालयासमोर तुम्हाला सांगता येत नाही. तुमचा भारत देशात जन्म झाला आहे. याचा अर्थ भारतातले सगळे कायदे तुम्हाला माहीत आहेत आणि तुम्हाला लागु होतात असे समजुन न्यायालय तुम्हाला शिक्षा ठोठावु शकते.