Udyam Registration
उद्यम रजिस्ट्रेशन MSME Registration Online
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाने यापूर्वीच 26 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2020 पासून उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणी यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एखादा उद्योग उद्यम म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटले जाईल.
या प्रक्रियेची अधिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
एमएसएमई नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, कागदविरहित आणि स्वयं-घोषणेवर आधारित असेल. एखाद्या एमएसएमईच्या नोंदणीसाठी कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे जोडण्याची आवश्यकता नाही.
नोंदणीसाठी आधार क्रमांकाची आवश्यकता आहे; नोंदणीनंतर एक नोंदणी क्रमांक दिला जाईल
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, एक उद्यम नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल;
या प्रमाणपत्रावर एक डायनॅमिक क्यूआर कोड असेल ज्याच्या द्वारे आमच्या पोर्टलवरील वेबपेज आणि उद्योगाच्या तपशीलाची माहिती मिळवता येईल;
नोंदणीचे नूतनीकरण करण्याची कोणतीही आवश्यकता नाही;
गुंतवणूक आणि उद्योगांची उलाढाल, पॅन आणि जीएसटीशी संबंधित तपशील आपोआप संबंधित सरकारी यंत्रणेकडून घेतला जाईल;
एमएसएमई मंत्रालयाची ऑनलाईन प्रणाली प्राप्तिकर आणि जीएसटी इन प्रणालीशी पूर्णपणे एकात्मिक असेल;
ज्यांच्याकडे ईएम-II किंवा यूएएम नोंदणी किंवा एमएसएमई मंत्रालयांतर्गत, असलेल्या इतर प्राधिकरणाने जारी केलेली इतर प्रकारची नोंदणी असेल त्यांना स्वतःची नव्याने नोंदणी करावी लागेल;कोणत्याही उद्योगाने एकापेक्षा जास्त उद्यम नोंदणी करू नये. मात्र, उत्पादन किंवा सेवा किंवा दोहोंसहित कितीही व्यवहारांची माहिती एकाच नोंदणीमध्ये विशेषत्वाने नमूद करता येईल किंवा भर घालता येईल.
चॅम्पियन्स कंट्रोल रुम आणि डीआयसीजमध्ये एक खिडकी नावाची सरकारी सुविधा यंत्रणा या प्रक्रियेत लोकांना मदत करेल;
नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क आहे. या संदर्भात कोणताही खर्च किंवा शुल्क चुकते करू नये.
ही प्रक्रिया अतिशय साधी, सोपी आणि उद्योजकसुलभ असल्याचा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे. यामुळे व्यवसाय सुलभतेचा एक आदर्श केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होईल. यामुळे एकंदर प्रक्रियांचा वेळ आणि खर्च वाचेल. उद्योजक आणि उद्योग यांना त्यांच्या प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करता येईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनता येईल.
त्याच वेळी काही खाजगी वेबसाईट्स सरकारी वेबसाईट्स असल्याचा दावा करत असल्याचे लक्षात घेऊन भारत सरकारच्या (www.udyamregistration.gov.in) या पोर्टल व्यतिरिक्त आणि सरकारच्या एक खिडकी सुविधा प्रणाली व्यतिरिक्त कोणत्याही खाजगी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रणाली, सेवा, संस्था किंवा व्यक्तीला एमएसएमई नोंदणी करण्याचा किंवा या प्रक्रियेशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्याचा अधिकार नसेल, असे मंत्रालयाने सांगितले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
पॅन कार्ड
पत्त्याचा पुरावा( विजेचे बिल किंवा भाड्याचा करार)
Income Tax Return (भरत असल्यास)
नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा :
उद्यम नोंदणीसाठी आम्हाला 9404104242 या क्रमांकावर Whatsapp करा.
आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला उद्यम नोंदणी प्रकार आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी मार्गदर्शन करु.
दिलेल्या क्रमांकावर किंवा आमच्या ई-मेल वर तुमची व्यवसायिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवा.
आम्ही तुमचा अर्ज उद्यम च्या अधिकृत वेबसाईटवर दाखल करू.
तुम्हाला प्रमाणपत्र किंवा परवाना तुमच्या Whatsapp किंवा ई-मेलवर मिळेल.
Good…Haldi, or,masale
Naya project CaluKarnaHi…
Please Call 9423512451/9404104242